जिंदगी एक्सप्रेस
डायरीतल्या कविता अन बरच काही
|| उंबरठा ||
कळतं तुला हल्ली सारे काही
वेदना काळजाच्या कळत नाही
जर का चुकून मी हसलो जरा
जुना चेहरा माझा मिळत नाही
मिठीत ये जरा आनंद गाऊ दुःखा
रडण्यास एवढे आयुष्य पुरे नाही
ऊन तुला देऊन सावली नकोशी होते
पाचोळा,मला पाऊस होता येत नाही
विकले वावर अन गाव पोरके झाले
उंबरठ्यावर आता जीव गुंतत नाही...🌿
:- गणेश पाटील...
तिच्या वरच्या कविता
|| तिच्या वरच्या कविता ||
(१)
पाऊस सारखा कोसळत असतो
वाट मिळेल फाटा फुटेल तिकडे
बेवारस पाऊस गुंतत जातो
तुला परीघ करून तुझ्यात
कळत
नकळत...🌿
(२)
माझ्या अंत्ययात्रेचा प्रवास
तुझ्या वाटेवरून संपल्यावर
प्रेत माझे समशानात
शांत विझल्यावर
तू
आठवणीने
माझ्या राखेतून
तुझ्या वरच्या कविता घेऊन जा...🌿
(३)
तु
निघुन गेल्यावर
तसं
फारस
काही घडलंच नाही...🌿
( ४)
कित्येकदा
कविता
वाहून जातात,
डोळ्यातून
तू आठवल्यावर...🌿
(५)
नकोना
आयुष्यात
चांदन्यांचा खेळ मांडू
पुढे तुला
मोकळे आकाश आहे...🌿
(६)
एक
तुझेच नाव
होते
ओठांवर
शेवटी
गाव
सोडतांना...🌿
©गणेश पाटील
● बाईपण ●
बाई
बायतीन झाल्यावर
टीचभर सुद्धा होत नाही
दुखणं पुरुष
मनाला
तसंच
मुठभर बियाणं गर्भाशयात घेऊन
गाभण झालेल्या वावरा आतल्या
भुईने देखील सहन केलेल्या
असतात बऱ्याच वेदना
तसही
भुई अन् बाई
दोघांमध्ये जराही फरक नाहीये
हेच सांगू इच्छितो...🌿
■ गणेश पाटील..
■ हिशोब...
आता कुठे मना सारखं जगू लागलो
जळू लागलो तितका मी कळू लागलो
किती मार्मिक असतं ना स्मित हास्य
तुला हसु लागलो मग मी रडू लागलो
होतो कुठे आपण कुणाचे आयुष्या
आता जिवंतपणी मृत्यू पेरू लागलो
मूठभर उजेड देईल का कुणी मला
जर का अंधाराशी करार करू लागलो
सोडली तू मला का वाट नवी कोरी
जर काट्यांना हल्ली मीच रूतू लागलो
किती किळस येते मला माझ्या देहाची
काल रात्र भर मी हिशोब करू लागलो...
■ गणेश पाटील
+917219310859
Subscribe to:
Posts (Atom)
-
कळतं तुला हल्ली सारे काही वेदना काळजाच्या कळत नाही जर का चुकून मी हसलो जरा जुना चेहरा माझा मिळत नाही मिठीत ये जरा आनंद गाऊ दुःखा रडण्यास एव...
-
तसं मला सोडून जायला तिला सहा महिने झाले होते.पण तिच्या सोबत घालवलेला क्षण मला सोडून जायला तयार नव्हते. सारख ती आणि तिच्या आठवणी मनाच्...