■ हिशोब...

आता कुठे मना सारखं जगू लागलो
जळू लागलो तितका मी कळू लागलो

किती मार्मिक असतं ना स्मित हास्य
तुला हसु लागलो मग मी रडू लागलो

होतो कुठे आपण कुणाचे आयुष्या
आता जिवंतपणी मृत्यू पेरू लागलो

मूठभर उजेड देईल का कुणी मला
जर का अंधाराशी करार करू लागलो

सोडली तू मला का वाट नवी कोरी  
जर काट्यांना हल्ली मीच रूतू लागलो

किती किळस येते मला माझ्या देहाची
काल रात्र भर मी हिशोब करू लागलो...


■ गणेश पाटील
 +917219310859

■ गुढीपाडवा...


उभारावी उंच गुढी सोनेरी
मिटू घ्यावा दुरावा नात्यातला

ओंजळभर उजेड घेऊन
पुसावा अंधार मनातला



:- गणेश पाटील

एक कविता...

मला हवे आता तेच करू
महत्वाचे जितुकें तितुकेच बोलू

एक जखम का अजून सलते आता ?
तू ओठ ध्यावे मग औषधीचा विचार करू

एका पेंगने कुठे होते काही हल्ली
ओत सारी ग्लासात मग शुद्धीचा विचार करू

तुही वाचतेस अजूनही शब्दनं शब्द मला
शोध मला आता नकोना टाळाटाळ करू

            ● गणेश पाटील


■ एक तुकडा...🌿