तिच्या वरच्या कविता

|| तिच्या वरच्या कविता ||


                 (१)

पाऊस सारखा कोसळत असतो
वाट मिळेल फाटा फुटेल तिकडे

बेवारस पाऊस गुंतत जातो
तुला परीघ करून तुझ्यात

कळत
नकळत...🌿


            (२)

माझ्या अंत्ययात्रेचा प्रवास
तुझ्या वाटेवरून संपल्यावर

प्रेत माझे समशानात
शांत विझल्यावर 

तू
आठवणीने
माझ्या राखेतून 
तुझ्या वरच्या कविता घेऊन जा...🌿


          (३)


तु 
निघुन गेल्यावर 

तसं

फारस 
काही घडलंच नाही...🌿

   
              ( ४)

कित्येकदा 
कविता 
वाहून जातात,
डोळ्यातून
तू आठवल्यावर...🌿

        
               (५)


नकोना
आयुष्यात 
चांदन्यांचा खेळ मांडू
पुढे तुला 
मोकळे आकाश आहे...🌿


           (६)


एक
तुझेच नाव
होते 
ओठांवर 
शेवटी 
गाव 
सोडतांना...🌿


©गणेश पाटील

● बाईपण ●


बाई 
बायतीन झाल्यावर
टीचभर सुद्धा होत नाही 
दुखणं पुरुष 
मनाला

तसंच

मुठभर बियाणं गर्भाशयात घेऊन
गाभण झालेल्या वावरा आतल्या 
भुईने देखील सहन केलेल्या 
असतात बऱ्याच वेदना

तसही
भुई अन् बाई 
दोघांमध्ये जराही फरक नाहीये  

हेच सांगू इच्छितो...🌿

■ गणेश पाटील..

■ एक तुकडा...🌿