कोरी ओझड....

       ।१।
कोऱ्या ओंजळीला एकट्याने
कवदूर पोसावे,
ओसळु द्यावी मनातल्या मेघांची
एक सर,
तळहातवरच्या स्वतःपुरता रेखाटलेल्या
रंगहीन झालेल्या,
कँनव्हास वर,
काळजाला थेट डाग लगेस्तो..

   ।२।
मग ओठांनी तुझ्या ओठांशी बोलू नये,
हल्ली बरेच किळसवाणी ही वाटते ते,
डोळ्यानी समजु नये एक मेकांची भाषा,
बंद करून आठवण बसावं,
ती पहिली भेट
शिळ्या,जून्या,
त्या मिठी, ते ओठ
तुझ्ये ,माझ्ये...
                    © गणेश पाटील। #प्रीत

विठ्ठल आणि मराठी साहित्य एकच वाट, एकच श्वास🌿

“विठ्ठल” म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो  काळा सावळा, साधा भोळा, हात कमरेवर ठेवून उभा असलेला पंढरीचा विठोबा.पण विठ्ठल म्हणजे केवळ देव नाही ...