दुष्काळग्रस्त...

उपाशी चोच घेवून
गावभर हिंडणारी पाखर,
कंसा वर येवुन बसतात,
तुकडे बापच्या मासाचे
चोचीत बरन्या करीता.

अन्
बाप तरी खंगारलेले
मास नसलेले हाड घेवून
जिद्दीन सालभर उभाच
असतो ......

                 ©प्रीत

विठ्ठल आणि मराठी साहित्य एकच वाट, एकच श्वास🌿

“विठ्ठल” म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो  काळा सावळा, साधा भोळा, हात कमरेवर ठेवून उभा असलेला पंढरीचा विठोबा.पण विठ्ठल म्हणजे केवळ देव नाही ...