माझे नाव माझा पत्ता...

तुझ्या आयुष्यातून झाले कोरे माझे नाव

विचारू नको पत्ता,नको पुन्हां माझे गाव


दोस्त गुंफू नको दुःखा वर,संत्वनाची माळ,
सोसावत नाही रे हल्ली,काळजावरचा घाव


काल ग्लास ओठावर आला,मी नशेत आलो
उगा तेंव्हा बदनाम मी केले,तुझ्या चुंबनचे नाव


यारहो कत्तलखाने कुठे प्रामाणिक असतात का?
माझ्या विश्वासाचे तुकडे विका,हवा तो हमीभाव...
           
                                        :- गणेश पाटील
                                              #प्रीत


प्रवास...

फुले तोडणाऱ्याने काटे मोजू नये
ओठ चुंबणाऱ्याने किनारे शोधू नये

लाख सोबतीचे करार केले आपण
हात दिल्यावर वायदे तू तोडू नये

येवढा कसा जीव द्यावा एखाद्या वर
हृदयाचा ठोका सुरू बंद कळु नये

उगाच आणतो लाखदा मी चेहऱ्यावर हसू
सु:खा मागचे माझ्या दुःख तुला कळु नये

अखेरीस वेगळ्या केल्या आपण वाटा
एक तुला एक मला प्रवास संपू नये

                       :- गणेश प्रकाश पाटील
                                #प्रीत

विठ्ठल आणि मराठी साहित्य एकच वाट, एकच श्वास🌿

“विठ्ठल” म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो  काळा सावळा, साधा भोळा, हात कमरेवर ठेवून उभा असलेला पंढरीचा विठोबा.पण विठ्ठल म्हणजे केवळ देव नाही ...