|| उंबरठा ||
कळतं तुला हल्ली सारे काही
वेदना काळजाच्या कळत नाही
जर का चुकून मी हसलो जरा
जुना चेहरा माझा मिळत नाही
मिठीत ये जरा आनंद गाऊ दुःखा
रडण्यास एवढे आयुष्य पुरे नाही
ऊन तुला देऊन सावली नकोशी होते
पाचोळा,मला पाऊस होता येत नाही
विकले वावर अन गाव पोरके झाले
उंबरठ्यावर आता जीव गुंतत नाही...🌿
:- गणेश पाटील...
Subscribe to:
Comments (Atom)
विठ्ठल आणि मराठी साहित्य एकच वाट, एकच श्वास🌿
“विठ्ठल” म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो काळा सावळा, साधा भोळा, हात कमरेवर ठेवून उभा असलेला पंढरीचा विठोबा.पण विठ्ठल म्हणजे केवळ देव नाही ...
-
तसं मला सोडून जायला तिला सहा महिने झाले होते.पण तिच्या सोबत घालवलेला क्षण मला सोडून जायला तयार नव्हते. सारख ती आणि तिच्या आठवणी मनाच्...
-
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही राष्ट्र. आपल्या देशाची खरी ओळख म्हणजे सांस्कृतिक आणि भाषिक विविधता. आपल्या संविधानात २२ अधिकृत भाषांना मा...
-
“मराठी साहित्य वटवृक्ष आहे” असं आपण अभिमानाने सांगतो. पण त्या वटवृक्षाची सावली इतकी दाट झाली आहे की, नवीन लेखक, कवी, कथाकार यांन...