गुपितं...

या पावसाने मला
जाळायचं नाही
मी तुला तू मला
आठवायचं नाही

सुटणारे हात बहुतेक
लाचार आहेत
जगणे आपले
लाचार दाखवायचं नाही

कोण कसे कुंठवर
आलो सोबत आपण
गुपितं आपले सारे
कुणाल कळायचं नाही

                    © गणेश पाटील #प्रीत
                        +917219310859

अहिराणी भाषा प्राचीनता अन संवर्धन...

अहिराणी भाषा हि खान्देशातील प्रमुख भाषा आहे.हि भाषा खान्देशात प्राचीन काळापासून बोलली जात आहे. परंतु,आता दिवसेंदिवस नवनवीन शोध लागत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्याच बरोबर भाषा ही बदलत चालल्या आहेत. अहिराणी आता काही खान्देश वासींना आवडत नाही. आणि या भाषेला तर आता मृत भाषा म्हणून घोषित करण्यात आले आहे. म्हणून या आपल्या अहिराणी मातेला वाचविण्याचा प्रयत्न करायला हवा

 ही श्रेष्ठ अहिराणी भाषा. या अहिराणी भाषेवर आणि खान्देशावर कितीही लिहिले तरी कमीच आहे. कारण की, हि एक वीरांची भूमी आहे. या भूमीवरती शूरवीर जन्माला आले, आणि या भूमातेला आणखीन पवित्र केले.

महाराष्ट्राबाहेर मराठी साम्राजाचा विस्तार करणारे लढवय्ये खान्देशीच आहेत. इंदूरचे मल्हारराव होळकर तळोदयाचे होते. बुंदेल खंडाची राणी लक्ष्मीबाई झांसीवाली पारोळ्याची कन्या होती. बडोद्याचे दानशूर राजे सयाजीराव गायकवाड कौळाणे (मालेगाव) येथील होते. अहिल्याबाई होळकर अशी कितीतरी नावे घेता येतील.

राम रावण युद्धात न्यायाच्या बाजूने लढतांना पहिला बळी जटायूंच्या नावाने जसा खान्देशी माणसाचा गेला, अगदी तसेच बलिदान ब्रिटीशांविरोधात लढताना खान्देशी लोकांनी केले. ब्रिटिश सत्ते विरूध्द स्वातंत्र्य युद्ध पेटवून ब्रिटिशांची पहिली गोळी छातीवर झेलणारी झाशीची राणी जशी होती तशी या युद्धात शेवटची गोळी छातीवर झेपणारा वीर बालक शिरीष कुमार (नंदुरबारकर) खान्देशी होता.

अशा या पावन भूमीवर महान अहिराणी भाषिक होऊन गेले. खाज्या नाईक (शिरपूर, सेंधवा), महाराजा सयाजीराव गायकवाड (कवळाणे) मालेगांव, रा.ग.गडकरी (गणदेवी), वि. का. राजवाडे (धुळे), महादेव गो. रानडे (निफाड),डॉक्टर. उत्तमराव पाटील (डांगरी), डॉ. लिलाताई पाटील ( डांगरी अमलनेर ), बहिणाबाई चौधरी (असोधा), पां. स. साने गुरुजी
(अमळनेर),भाऊसाहेब हिरे (दाभाडी), ध.ना. चौधरी  (फैजपूर), ग.द.माळी गुरूजी (शिरपूर), शिरीष कुमार मेहता (नंदुरबार), दादासाहेब गायकवाड (आंबे-दिंडोरी), श्री. अ.डांगे (करंज), दादासाहेब फाळके (नाशिक), वि. वा. शिरवाडकर (नाशिक), तर्कतिरथं लक्ष्मणशास्त्री जोशी (पिंपळनेर), लताताई मंगेशकर (थाळनेर),तंटया भिल्ल (रावेर-बरहाणपुर). हे खान्देशातील माणिकमोती. या बरोबरच आणखीन भरपूर अहिराणी माणिकमोती आहेत.

मंडळी, भाषा निर्माण होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. आणि तिचाच आज नकार करणे हे चुकीचे आहे. आणि ते ही आपल्या अहिराणी भाषेचे..

आज अहिराणीला वाचवणे ही काळाची गरज आहे. कारण अहिराणी गेली की, सगळेच संपेल. आपले अस्तित्व ही संपेल. कारण ही महाराष्ट्रात मराठी भाषेसारखीच पवित्र भाषा आहे. म्हणूनच या भाषेला जिवंत ठेवायला हवे. तिचा आदर करायला हवे. अहिराणीच काय प्रत्येक भाषेचा मानवाने आदर करायला हवा..

              "घर घर संदेस ,सोनाना खान्देश"

             

बाईपणाची कविता...

माती करणाऱ्या देहाच्या हरेक रात्रीचा
अंत का होत नाही ?
सुचत नाही
सुचत नाही....

तिच्या जखमा कुठवर झाकून ठेवेल
वाळलेल्या अस्तित्वाचे
खवले बाहेर येऊन फेकेल
बिल्लासभर पोटाची भूक
का मिटता-मिटत नाही.?
सुचत नाही
सुचत नाही.....

पायात पाय घालून गर्भाशयाच्या यातना
रोज नवाच देह,सोसत ती
वासनात जगणं जात करपून
जगन कणते ती
मग
बाई पणाचे आश्रू
का लपवते बाई.?
सुचत नाही
सुचत नाही....

            गणेश प्रकाश पाटील
                       #प्रीत

संसाराचा पेचा...

शिवारी चांदन्याची माज
भाकरीचा डोक्यावर धुडा
वाट सरते तळपायी गोंदून काटे
दारवडतो सारा बाईपणाचा चुडा

                       आभाळ मल्हार मोकळं
                       ऊन,सावली मातीचा पदर
                       झाकतो छाती,उघडं अंग
                       घामाने भिजलेला धुडा

रिकामे रांजन रिकामाच हांडा
ऊन रेंगाळते साजन बोळा
झुले झोका सुटे तोल 
फिरे भिंगरी सासर माहेर

                    दिन-रात हा जिंनगीचा खेळ   
                   अडकला जीव पदराचा फास 
                   माय माहेर गाठ पदराशी
                   सुटता तुटेना संसाराचा पेचा
               

                                   गणेश पाटील
                                       ©प्रीत

माझे नाव माझा पत्ता...

तुझ्या आयुष्यातून झाले कोरे माझे नाव

विचारू नको पत्ता,नको पुन्हां माझे गाव


दोस्त गुंफू नको दुःखा वर,संत्वनाची माळ,
सोसावत नाही रे हल्ली,काळजावरचा घाव


काल ग्लास ओठावर आला,मी नशेत आलो
उगा तेंव्हा बदनाम मी केले,तुझ्या चुंबनचे नाव


यारहो कत्तलखाने कुठे प्रामाणिक असतात का?
माझ्या विश्वासाचे तुकडे विका,हवा तो हमीभाव...
           
                                        :- गणेश पाटील
                                              #प्रीत


प्रवास...

फुले तोडणाऱ्याने काटे मोजू नये
ओठ चुंबणाऱ्याने किनारे शोधू नये

लाख सोबतीचे करार केले आपण
हात दिल्यावर वायदे तू तोडू नये

येवढा कसा जीव द्यावा एखाद्या वर
हृदयाचा ठोका सुरू बंद कळु नये

उगाच आणतो लाखदा मी चेहऱ्यावर हसू
सु:खा मागचे माझ्या दुःख तुला कळु नये

अखेरीस वेगळ्या केल्या आपण वाटा
एक तुला एक मला प्रवास संपू नये

                       :- गणेश प्रकाश पाटील
                                #प्रीत

■ एक तुकडा...🌿