दुर माझ्या राना मध्ये
पालवी फुलली कशी?
ईवलूशि खुशितली
लेक रे देखनी जशी,
ईवलूशे हात पाय
ईवलूशे नाती गोती,
ईवलू-ईवलू हट्ट
नाकी डोळे रे देखनी,
हाळचे पाणी ओतले
घामाचे खत ओतले,
लागले रोप ते वाळू
दाने वाय्राने डोलू,
दुर माझ्या राना मधे
पालवी फुलली कशी,
मया लावी काळी माती
बिन बापी लेख जशी,
गणेश प्रकाश पाटील(प्रित)
मो, +917219310850
मु.पो.मुकटी.ता.जि.धुळे
ganeshg1p2@gmail.com