मी घानीला जूपलेला
बैंलागत गरा-गरा,
दु:खे पालथा पळतो
वास या शेणा मुताचा,
माझ्या नशिबीत हिंडे,
पाय विहीर भूकेची,
पुरावी म्हनुन नुस्ता
हाकत असतो जीव,
राने उजळलेत म्हने
माझ्या कष्टाने यंदा,
नाचाव घुंगरुच्या
चापकाने दार बंद,
जनावर जिवंतसतो,
त्याच रितीनं यंदा
थुईथुई लो नभाने,
तांबळ फुटल तसे
लिंबावरचे कावळे,
टपुन बसतातते
चोच पिंळात टोचुन,
चमचमीत डोळ्याने,
उभी रहावी पाठीवर
शिकारी वाघाची धास्ती,
नेमक माझ्या सोबत
होय असच घळत,
साले साल हंगाम,
© गणेश प्रकाश पाटील
No comments:
Post a Comment